‘Friends’ फेम प्रसिद्ध अभिनेता मॅथ्यू पेरी चं निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता मॅथ्यू पेरी यांचे वयाच्या ५४व्या वर्षी निघणं झालं आहे. ‘फ्रेंड्स’ या लोकप्रिय वेब सिरीजमध्ये चँडलर बिंगच्या भूमिकेत मॅथ्यूचा जगभरात चाहतावर्ग तयार झाला. मॅथ्यू पेरीच्या अचानक जाण्याने हॉलिवूड सिनेसृष्टीलाच नाही तर त्यांच्या चाहत्यांनाही दुःख अनावर झाले आहे.

दिलेल्या माहितीनुसार, मॅथ्यू पेरी शनिवारी लॉस एंजेलिस येथील घरात बाथटबमधे मृतावस्थेत आढळला. मॅथ्यू यांच्या निधनाची बातमी कळताच, पोस्टाच्या माध्यमातून चाहते श्रद्धांजली वाहत आहे. त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. मॅथ्यूच्या मृत्यूनंतर त्याची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे. त्याच्या पोस्टाचा आणि मृत्यूचा संबंध असल्याचे चाहते बोलत आहे. मॅथ्यूने पाच दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केलेलं होती. त्या पोस्टमध्ये तो इन्फिनिटी पूलमध्ये गरम पाण्यामध्ये बसलेला दिसत आहे. पोस्ट शेअर करतांना मॅथ्यूने कॅप्शन दिले की, “अरे, इतकं गरम पाणी आपल्या शेजारी असल्यामुळे बरं वाटतं?, मी मॅटमन आहे.” शी पोस्ट त्याने शेअर केली आहे.

मॅथ्यू पेरीने १९९०मध्ये प्रदर्शित झालेल्या टेलिव्हिजन कॉमेडी ‘फ्रेंड्स’ या प्रसिद्ध मालिकेमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेने प्रेक्षकांचे १० वर्ष निखळ मनोरंजन केले होते. मॅथ्यू पेरीने फ्रेंड्स या मालिकेसोबतच, रोम-कॉम, फूल्स रश इन, द होल नाइन यार्ड्ससह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.