चालकास धमकावत बसची काच तोडफोड करणाऱ्यावर गुन्हा दाखल

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल आमंत्रण समोर एसटी बस समोर मोटर सायकल आडवी लावत चालकास धमकावत बसच्या काचा फोडणाऱ्या विरोधात पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला असून एकास ताब्यात घेतले आहे.

या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार असे दि २८ शनिवार रोजी दुपारच्या वेळी भुसावळ आगाराची बस क्र एमएच ४० एन ९९४१ मेहकर ते भुसावळ हि बस आयुध निर्माणी फाट्या जवळील व राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल आमंत्रण समोर मोटर सायकल क्र एमएच डी.आर ५०४३ वरील चालक कानात होडफोन घेऊन मोटर सायकल चालवित असताना अचानक बस समोर आपली दुचाकी बस समोर आडवी उभी केल्याने बस चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून मोटर सायकल बस समोर आडवी उभी करण्याचे कारण विचारले असता तु ओळखत नाही का ! मी वरणगावचा भाई आहे माझे नाव विशाल बेंडे आहे माझ्याशी डोके लावतो का ! असे म्हणत बस चालकास धमकावत रोडच्या कडेला दगड बसच्या समोरील काचेवर फेकत बसचे नुकसान केले. तर बस मध्ये प्रवास करीत असलेल्या एका पाच वर्षाच्या देवाशी स्वप्नील सुलताने वय (५) रा. गुजखेडा ता लोणार जि बुलढाणा या लहान बालीकेच्या डोक्याला दगड लागल्याने जखमी झाली आहे.

याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला बस चालक योगेश यशवंत सावळे यांच्या तक्रारीवरून विशाल संजय बोंडे याच्या विरोधात भादवी कलम ३५३, ३४१, ३३७, ३३८, ३३६, २७९, मोटर वाहन कायदा कलम १८४ सर्वाजनीक संपती हनी प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पो हे कॉ नागद्रे तायडे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.