जैतपीर येथे विविध विकासकामांचे आ.पाटलांच्या हस्ते उद्घाटन…

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यातील मौजे जैतपीर येथे 60 लक्षच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विकास यावेळी ग्रामस्थांनी आमदार पाटलांचा सत्कार केला.

आपल्या मनोगतात मतदारसंघात सुरू असलेल्या विकासाचा आराखडा मांडून, प्रत्येक गावाचा विकास हेच आपले लक्ष असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. या प्रसंगी अशोक पाटील, सुनील पवार यांच्यासह सरपंच महेंद्र पाटील, उपसरपंच साहेबराव देशमुख, संजय सोनवणे, निलेश बागूल, कोमल पाटील, अजबसिंग पाटील, नेहरू पाटील, आजाब पाटील, सुषमा पाटील, योगेश भिल, नारायण धनगर, नागो पाटील, समाधान पाटील, अनिल पाटील, विजय पाटील, दत्तात्रय पाटील, धनंजय पाटील, भास्कर चौधरी, उमाकांत पाटील, विलास पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

या विकास कामांचे झाले उद्घाटन

जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना रक्कम 60.41 लक्ष,

डी.पी.सी. अंतर्गत नवीन अंगणवाडी बांधकाम रक्कम 11.85लक्ष,

तलाठी कार्यालय बांधकाम रक्कम 25.00 लक्ष.

एकूण रक्कम- 97.26 लक्षच्या कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.