सनरायजर्स हैदराबादने IPL च्या या हंगामासाठीच्या जर्सीचे केले अनावरण…

0

 

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क:

यंदाच आयपीएल 2023 हे तब्बल १४ दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यासाठी सरावच संघ जय्यत तयारी करतांना दिसत आहे. तर काही संघ आपल्या मुख्य खेळाडूंच्या दुखापतीमुळे पर्याय शोधतांना दिसत आहे. तर सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderbad) संघाने आपली जर्सीचं अनावरण केलेय. हैदराबाद संघाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये जर्सी लाँच केल्याचं सांगण्यात आले आहे.

https://twitter.com/SunRisers/status/1636238364281282560?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1636238364281282560%7Ctwgr%5Ecb632b3c4e016081c77aa940ca44b3bc30dc30e4%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fsports%2Fipl%2Fsunrisers-hyderabad-revealed-their-new-jersey-for-ipl-2023-season-watch-video-1160397

हैदराबाद संघाने ट्वीट केलेल्या व्हिडीओत मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याच्याशइवाय उमरान मलिक (Umran Malik) आणि वॉशिंगटन सुंदर (Washington Sundar) हे नव्या जर्सीमध्ये दिसत आहेत. ऑरेंज आर्मीची ही जर्सी अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हैदराबाद संघाने ट्वीट करत नव्या जर्सीची माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये हैदराबाद संघाने म्हटलेय की, आयपीएल 2023 साठी आमची ऑरेंज आर्मी सज्ज झाली आहे.  हैदराबाद संघाने ट्वीट केलेल्या व्हिडीओत मयंक अग्रवाल याच्याशिवाय वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि अष्टपैलू वॉशिंगटन सुंदर दिसत आहेत. हैदराबाद संघाच्या चाहत्यांना ही नवी जर्सी पसंतीस पडली आहे. सोशल मीडियावर हैदराबादच्या या ऑरेंज जर्सीची चर्चा आहे. हैदराबादने ट्वीट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नुकतीच दक्षिण अफ्रिका टी20 फ्रेंचायजी लीगमध्ये (SA20) सनरायजर्स फ्रेंचायजीचं नेतृत्व मारक्रम याने केले होते. त्यात स्पर्धेत त्याच्या नेतृत्वात संघाने अजिंक्यपद प्राप्त केले होते. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं नेतृत्व केल्यामुळे कर्णधारपदाचा अनुभवही आहे. या सर्व गोष्टींमुळे त्याला सनरायजर्सने यंदा आपला कर्णधार म्हणून घोषित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here