जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन

जिल्हा परिषदेत ४ हजार ९६ मोबाईल दाखल

0

जळगावः – केंद्रशासनाच्या योजनेतून महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत सुरू असलेल्या शहरी व ग्राममिण अंगणवाड्यांच्या अंगणवाडी सेविकांसह पर्यवेक्षीकांना स्मार्टफोन दिले जाणार असुन  ४ हजार ९६ मोबाईल दाखल झाले आहे. तालुकास्तरावर या स्मार्ट फोनचे वितरण करण्यात आले असुन या स्मार्टफोनच्या माध्यमातून विविध प्रकारची माहीती आता प्रशासनाला अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. लवकरच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

जिल्ह्यातील ३९४४ अंगणवाडी सेविका व १५२ पर्यवेक्षीकांना येत्या आठवडाभरात स्मार्टफोन मिळणार आहे. त्याद्वारे सर्व माहिती आणि दैनंदिन अहवाल हा ऑनलाईन भरावा लागणार आहे.

जिल्ह्यात ४०४४ अंगणवाड्या

जिल्ह्यात ४०४४ अंगणवाड्या आहेत.त्यात ग्रामिण भागात ३४३५ तर शहरी भागात ५०९ अंगणवाड्या आहेत. त्यात अंगणवाडी सेविकांची संख्या ३९४४ असुन पर्यवेक्षीका १५२ आहे. शासनाकडून या अंगणवाडी सेविकांना सॅमसंग कंपनीचे स्म् ार्टफोन, टफन, कव्हर, चार्जर व सामग्री देण्यात आली आहे. यासाठी शासनाकडून निविदा प्रक्रीया मुख्यालयाला मिळू शकणार आहे.होवून साधारणतः ६ कोटींचे स्मार्ट फोन खरेदी करण्यात आले आहे. जिल्हाभरात प्रत्येक तालुक्यात काल या स्मार्टफोनचे जिल्हा परिषदेकडून वितरण करण्यात आले. सर्वच क्षेत्रात ऑनलाईन कामकाजाची सुरुवात झाली आहे. पूर्वी संगणकावर काम करून त्याचा ई-मेल पाठवून ऑनलाईन काम केले जात होते. परंतु आता संगणक आणि लॅपटॉपवरून थेट मोबाईलवर ऑनलाईन कामकाज आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.