गुजरातच नव्हे तर देशात ‘मोदी लाट’ कायम : अमित शहा

0

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत १० घुसखोरांचा कठोरपणे सामना केला. त्यांनी देशाला समृद्ध व सुरक्षित बनवले. डोकलाम येथे चीनची घुसखोरी हाणून पाडली. त्यामुळे केवळ गुजरातच नव्हे तर देशभरात ‘मोदी लाट’ कायम आहे, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केला. दक्षिण व उत्तर भारतासह देशाच्या कानाकोपऱ्यात मोदी नावाचा जयजयकार होत आहे. ‘अब की बार ४०० पार’ अशा घोषणा नागरिक स्वयंस्फूर्तपणे देत असल्याचे शाह म्हणाले.

आगामी लोक सभा निवडणुकीसाठी भाजपने गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी येथे प्रचाराची सुरुवात केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासोबत शाह यांनी अहमदाबाद येथील गुरुकुल रोड स्थित मंदिरात पवनपुत्र हनुमान यांची पूजाअर्चा केली. त्यानंतर, दोघांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुष्पांजली अर्पण केली. या ठिकाणीकार्यकर्त्यांना संबोधित करतानाअमित शाह म्हणाले की, देशात१,५०० राजकीय पक्षआहेत.पण, सतरंज्या उचलणे, पडदेलावणे व पोलचिट वाटणाऱ्याला केंद्रीय मंत्री व पक्षाध्यक्ष बनवणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे..

एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या व चहा विकणाऱ्या व्यक्तीला भाजपनेच पंतप्रधान व जागतिक नेता बनवल्याचे शाह यांनी
सांगितले. मला गांधीनगरमधून उमेदवार बनवल्याबद्दल शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानले. ३० वर्षांपूर्वी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत असताना याच हनुमान मंदिरात पूजा केली होती. त्यानंतर, प्रचार अभियान सुरू केल्याची आठवण शाह यांनी सांगितली. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावे. मतदारांनी कमळ हे बटण दाबून मला विजयी करावे, असे आवाहन शाह यांनी केले.

यामुळे ममतांचा हा अपघात घातपात असल्याची कुजबुज सुरू झाली. परंतु डॉ. बंडोपाध्याय यांनी शुक्रवारी खुलासा करत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली. ममतांना धक्का लागल्याचे जाणवले असेल, असे आपल्याला म्हणायचे असल्याचे बंडोपाध्याय यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. दरम्यान, ममतांच्या दुखापतीबद्दल समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी एक्स या सोशल मीडियावरून ट्विट करत त्यांना लवकर बरे वाटावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या होत्या. ममतांनी शुक्रवारी पंतप्रधानांच्या या सदिच्छांबद्दल आभार व्यक्त केले. इतर नेत्यांच्या ट्विटवरही ममतांनी प्रतिक्रिया देत आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.