आज जाहीर होणार लोकसभा निवडणूक

0

नवी दिल्ली: ;- केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करेल. लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि ओडिशा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही जाहीर होतील. निवडणूक जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू होईल.
विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी पूर्ण होत आहे.

त्यापूर्वी निवडणूक होऊन नव्या लोकसभेची स्थापना करणे गरजेचे आहे. मे महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. शनिवारी दुपारी ३ वाजता एक पत्रकार परिषद घेऊन लोकसभा आणि काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे शुक्रवारी निवडणूक आयोगाने सोशल मीडियाद्वारे सांगितले. देशभरात लागू होणार आदर्श आचारसंहिता पर्व मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार हे दोन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांच्यासोबत पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील

Leave A Reply

Your email address will not be published.