अमळनेर येथील अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याची मुजोरी

कार्यालयात दारू पित असतांनाच व्हिडिओ व्हायरल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कोणत्याही प्रशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करून कार्यालयातच मध्यपान करावं हे कितपत योग्य आहे ? असा प्रश्न सध्या अमळनेरमध्ये उपस्थित केला जपतोय. याबाबत अमळनेरसह जळगाव जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरु आहे. काही जण संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. या अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही होत आहे. विशेष म्हणजे संबंधित अधिकारी ज्या कार्यालयात कार्यरत आहे ते कार्यालय अतिशय महत्त्वाचं आहे. आपत्कालीन परिस्थितीत किंवा संकट काळात या कार्यालयाची अतिशय मौल्यवान अशी मदत होते. असं असताना संबंधित अधिकाऱ्याला आपल्या जबाबदारीची जाणीव नासानं हे खरंच विशेष आहे.

नेमकं प्रकरण काय ?
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन कार्यालयात अधिकारी दारू पित असल्याचा व्हिडिओ एका तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफानविरल झाला आहे. अमळनेर शहरातील परेश उडवलं नामक तरुणाने काही दिवसांपूर्वी त्याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ चित्रित केल्याचं सांगितलं जात आहे. हा प्रकार समोर आणल्यानंतर त्याने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. पण त्या मुजोर अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये. म्हणून तक्रारदार परेश उदेवाल याने उपोषणाचा इशारा देखील दिलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.