भडगाव आरटीओ कार्यालयासाठी सर्वपक्षीय नेते आक्रमक

भडगाव तालुका बचाव कृती समितीच्या वतीने शुक्रवारी रास्ता रोकोचा इशारा

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव हा जळगाव लोकसभेच्या मध्यभागी असलेला तालुका व केंद्रबिंदू असून येथे आरटीओ कार्यालय प्रस्तापित व्हावे असा अहवाल यापूर्वी अनेकदा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. त्यासाठी अनेक वेळा भडगाव येथे जागेची पाहणी करण्यात आली होती. मागील महिन्यातही शहरातील जागेची पाहणी आरटीओ विभागाच्या वतीने करण्यात आली होती मात्र, अचानक आरटीओ कार्यालय चाळीसगाव येथे मंजूर झाल्याच्या वृत्ताने भडगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली. याबाबत आज भडगाव येथील स्थानिक नेते व सर्वपक्षीय नेत्यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन या गोष्टीचा निषेध व्यक्त करत शुक्रवार दिनांक 23 रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.

आज झालेल्या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत भडगाव बचाव कृती समितीने आरोप केला आहे की, सत्ताधारी लोकांनी भडगाव तालुक्याला विकासापासून वंचित ठेवले आहे. भौगोलिक दृष्ट्या भडगाव तालुका सक्षम आहे. भडगाव येथे विकास होऊन भविष्यात भडगाव स्वतंत्र मतदार संघ होऊ नये म्हणून त्याला सातत्याने विकासापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा आरोपी या पत्रकार परिषदेत करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.