पेटीएम क्युआर कोड, साउंड बॉक्स मशीन बद्दल मोठी अपडेट !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सध्या अडचणीत सापडलेल्या पेटीएमला मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने स्पष्ट केलं आहे की, क्युअर कोड, साउंड बॉक्स आणि कार्ड मशीन कुठल्याही अडचणीशिवाय चालू राहतील असे स्पष्ट केलं आहे.

पेटीएम पेमेंट्स बँक विरोधात आरबीआयने कारवाई केल्यानंतर पेटीएम सर्व्हिसेस बद्दल अनेक अफवा सुरु आहेत. पेटीएमची पॅरेंट कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स ने मर्चंट्सना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून आपले नोडल अकाउंट एक्सिस बँकेला दिला आहे. यासाठी एस्क्रो अकाउंट उघडण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, वन ९७ कम्युनिकेशन्सची सब्सिडरी कंपनी पेटीएम सर्व्हिसेस आधीपासूनच एक्सिस बँकेसोबत काम करत होती.

फिनटेक कंपनीने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की व्यापाऱ्यांचे QR कोड, साउंड बॉक्स आणि कार्ड मशीन कोणत्याही व्यत्ययाशिवाय कार्यरत राहतील. व्यापारी सेटलमेंटमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी, ॲक्सिस बँकेशी करार करण्यात आला आहे.

नोटबंदीनंतर पेटीएमला मोठा नफा झाला होता. तसेच पेटीएम ही देशातील OR आणि मोबाईल पेमेंट क्षेत्रातील मोठी कंपनी बनली होती. कंपनीने करोडो व्यापाऱ्यांसोबत भागीदारी करून डिजिटल पेमेंट्सचे मोठे नेटवर्क तयार केले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारचे ग्राहक त्याच्याशी जोडले गेले. पण, पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने केलेल्या कारवाईमुले त्याला मोठा धक्का बसला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.