सोशल मीडियावर अक्षयच्या या वागणुकीची जोरदार चर्चा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बऱ्याच ठिकाणी भेट देतांना दिसत आहे. आणि जेवढा मोठा अभिनेता त्यांचे चाहतेही तेवढे आणि आपल्या आवडत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला भेटता यावे यासाठी चाहते वाट्टेल ते करतांना दिसतात. नुकतेच अक्षय आणि इमरान हे मुंबई मेट्रोच्या सफरीला निघाले होते. त्यानंतर मुंबईतील एका कार्यक्रमात दोघांनी ‘सेल्फी’चं प्रमोशन केलं. या कार्यक्रमादरम्यान एका चाहत्याने बॅरिकेडवरून उडी मारून अक्षयला भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर जे झालं, त्याची क्वचितच कोणी कल्पना केली असेल.

एका चाहत्याने बॅरिकेडवरून उडी मारून अक्षयला भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षयसमोर उभ्या असलेल्या बॉडीगार्ड्सनी त्याला धक्का देऊन मागे हटवलं. त्यानंतर तो चाहता जमिनीवर पडला. त्याला पाहताचक्षणी अक्षयने बॉडीगार्ड्सना थांबवलं आणि त्या चाहत्याला जाऊन मिठी मारली. हे सर्व पापाराझींनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलं. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चाहत्यांप्रती असलेलं प्रेम पाहून खिलाडी कुमारवर नेटकरी खुश झाले. सोशल मीडियावर अक्षयच्या या वागणुकीची जोरदार चर्चा होत आहे. त्यावर विविध कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दोन गोष्टी मनात आल्या आहेत. एक म्हणजे अक्षयचे चाहते त्याच्यावर किती प्रेम करतात आणि दुसरं म्हणजे अक्षय त्याच्या चाहत्यांवर किती प्रेम करतो आणि त्यांचा किती आदर करतो’

Leave A Reply

Your email address will not be published.