अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

0

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान तर्फे अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करणेबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले . अमळनेर राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान व धनगर समाजाच्यावतीने अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर अथवा अहिल्यादेवी नगर करण्यात यावे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे कि ,

अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला. सीना नदी काठी वसलेल्या या गावात धनगर समाजाचे दैवतांचा जन्म झाल्याने ती भूमी पवित्र झाली आहे. या नामांतर करता संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात नामांतर रथयात्रा व मोर्चे समाज बांधवांनी काढले आहेत .अनेक समाज बांधवांनी नामांतरची मागणी आहे. तरी महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या भावना लक्षात घेऊन अहिल्यादेवी नगर व्हावे ही अपेक्षा राज्य सरकारकडून धनगर समाज बांधवांची आहे .तरी आमच्या मागणीच्या सहानभूतीपूर्वक विचार करून आमच्या भावना राज्य सरकारला कळवाव्यात. यावेळी अमळनेर नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देतेवेळी अध्यक्ष बन्सीलाल भागवत ,उपाध्यक्ष नितीन निळे, सचिव एस सी तेले सर, कार्याध्यक्ष डी ए धनगर, संघटक प्रभाकर लांडगे उपाध्यक्ष मच्छिंद्र लांडगे, हमाल मापाडी संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश देव शिरसाठ ,मौर्य क्रांती संघाचे तालुकाध्यक्ष गोपीचंद शिरसाठ, युवा मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख देवा लांडगे ,धानोरा सरपंच दिलीप ठाकरे, निंभोरा उपसरपंच आलेश धनगर, प्रदीप कंखरे, जयप्रकाश लांडगे, शशिकांत आढावे, प्रताप धनगर, तुषार इदे, सचिन शिरसाट ,जितेंद्र धनगर,अनिल धनगर,भाऊलाल पाटील,सुनील पाटील आदी उपस्थित होते

 

Leave A Reply

Your email address will not be published.