महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संपावर

0

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
शेंदुर्णी येथील अ .र . भा . गरुड महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी राज्यातील अकृषी विद्यापीठीय महासंघाची संयुक्त कृती समितीने पुकारलेल्याआंदोलनात सहभागी झाले आहेत १२ वी परीक्षांचे नियोजन यामुळे ठप्प होईल अशी परीस्थिती निर्माण झाली आहे .

या आहेत मागण्या

१) सेवाअंतर्गत सुधारितआश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेने शासन निर्णय पुनर्जिवित करुन सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करणे. २) सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०,२०,३० वयनिंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे. ३ ) सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करान विद्यापीठीय व महाविद्यालवीत शिक्षकेतर कर्मचान्यांना १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालवधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करणे. ४ ) विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचान्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे. ५) २००५ नंतर सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे. ६) विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचान्यांना महाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करणे.

आंदोलनाचे टप्पे व रुपरेषा –
यावेळी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. शेंदुर्णी महाविद्यालयातील सतिष बाविस्कर, हितेंद्रकुमार गरुड, सुधीर गरुड ,संभाजी भिल , लक्ष्मण सोनवणे ,श्रीमती सरला गरुड राजेंद्र संदानशिव. बशारत तडवी , सतिष पाटील मोहन पाटील. पंकज जैन आदी यात सहभागी झाले आहे. अ . र भा गरुड महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सिनेट सदस्य डॉ. वासुदेव आर पाटील यांनी निवेदन व मागणी पत्र स्विकारले . एन मुक्टो संघटनेचे माजी जिल्हा कार्य . सदस्य डॉ . भूषण पाटील , उपप्राचार्य – डॉ . संजय भोळे , डॉ शाम साळुंखे , प्रा . अमर जावळे , अभ्यास मंडळ सदस्य – डॉ प्रशांत देशमुख, डॉ योगिता चौधरी , डॉ महेश पाटील यांनी तसेच एम . व्ही . टी . ए संघटनाप्राचार्य फोरम व प्राध्यापक संघटनांनी या आंदोलनास पाठींबा दिला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.