वरणगाव महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर

0

वरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वरणगाव येथील शिक्षकेतर कर्मचारी यांनी विविध मागण्यासाठी सोमवार रोजी सकाळी बेमुदत संपावर गेले आहेत. प्रसंगी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी सेना राज्य अध्यक्ष अतुल शेटे यांच्या नेतृत्वात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यासाठी संपात सहभागी झाले आहेत.

या प्रसंगी स्थानिक एन मुक्टो अध्यक्ष प्रा अशोक चित्ते व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी वरील संपास पाठींबा जाहीर दिला आहे. विविध मागण्या खालील प्रमाणे आहेत सातवे वेतन आयोग लागू करण्यात यावा, जुनी अश्र्वाशित प्रगती योजना लागू करण्यात यावी, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी,154 दिवसांचा फरक रोखीने मिळावा. कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. या मागणीसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी संपात सहभागी एस डी पाटील, राहुल ठाकूर तुकाराम गायकवाड, सौ संध्या निकम मॅडम, रवि पाटील, योगेश देशमुख, ललित भोईटे, नारायण पाटील आदी शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.