श्री त्रिविक्रम मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

0

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील श्री. त्रिविक्रम मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक राजेंद्र पाठक होते. प्रारंभी राजेंद्र पाठक,अंबादास पाटील, सुनील साने,अँड. देवेंद्र पारळकर, मोतीलाल गुरव,ज्ञानेश जोशी, प्रविण गरुड तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन केले.
यावेळी कु .सृष्टी अशोक गरुड व कु.युगंधरा अशोक गरुड या भगिनींनी आपल्या ओघवत्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची ओळख करुन दिली. ओम एन्फोटेकचे संचालक ज्ञानेश जोशी यांनी घेतलेल्या आँनलाईन सामान्य ज्ञान परिक्षेतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. चिमुकल्या मंडळींनी बाल छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, मावळे यांची वेशभुषा साकारली होती.
यासाठी मंडळाचे नयन सोनार,मनोज जोशी, गौरव पाठक,भुषण मुळे,नितीन धोबी,दिपक पाटील, भैय्या सुर्वे,राहुल सोनार,तुकाराम धोबी कृष्णा गुरव,प्रमोद धोबी,राहुल गरुड, ऋषिकेश मुळे,पृथ्वी गरुड,बालाजी गुरव ,अनिकेत जोशी,गजानन गुरव,मुकेश पाटील, गणा मुळे, तसेच मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन अँड. देवेंद्र पारळकर तर आभार ज्ञानेश जोशी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.