आ. किशोर पाटील यांचा महात्मा सेवा फाऊंडेशनच्या वतीने सत्कार

0

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा शहरातील मुख्य रहदारीचा मार्ग असलेल्या कृष्णापुरी येथील हिवरा नदीवरुन ये – जा करण्यासाठी नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कृष्णापुरीला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण करून नागरिकांना होणाऱ्या अडचणींचा कायमचा विषय मार्गी लागला असल्याने १८ फेब्रुवारी रोजी पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आ. किशोर पाटील यांचा सत्कार महात्मा सेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल बाबुराव महाजन यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला आहे.

त्याच बरोबर तब्बल ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी पासून प्रलंबित असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचा प्रलंबित असलेला विषय देखील आमदार किशोर पाटील यांनी मार्गी लावून तमाम बहुजन समाजाच्या भावनांचा आदर केला आहे. याबाबत देखील महात्मा सेवा फॉउंडेशनतर्फे आ. किशोर पाटील यांचे जाहिर आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, मा. नगराध्यक्ष संजय गोहील, मा. उपनगराध्यक्ष शरद पाटे, शहर प्रमुख किशोर बारवकर, मा. नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, बापु हटकर, प्रवीण ब्राह्मणे, स्वीय्य सहाय्यक राजेंद्र पाटील, पंढरीनाथ पाटील, गजानन पाटील, पिंटू शिंदे, राज अमृतकर, पिंटू प्रजापत, अक्षय जैन, संदीपराजे पाटील, बंडू जगताप उपस्थित होते.

 

निवेदन देतेवेळी अध्यक्ष बन्सीलाल भागवत ,उपाध्यक्ष नितीन निळे, सचिव एस सी तेले सर, कार्याध्यक्ष डी ए धनगर, संघटक प्रभाकर लांडगे उपाध्यक्ष मच्छिंद्र लांडगे, हमाल मापाडी संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश देव शिरसाठ ,मौर्य क्रांती संघाचे तालुकाध्यक्ष गोपीचंद शिरसाठ, युवा मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख देवा लांडगे ,धानोरा सरपंच दिलीप ठाकरे, निंभोरा उपसरपंच आलेश धनगर, प्रदीप कंखरे, जयप्रकाश लांडगे, शशिकांत आढावे, प्रताप धनगर, तुषार इदे, सचिन शिरसाट ,जितेंद्र धनगर,अनिल धनगर,भाऊलाल पाटील,सुनील पाटील आदी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.