IPLच्या सोळाव्या हंगामाचं वेळापत्रक आले समोर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

आयपीएलची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असतात. आणि आता लवकरच आयपीएलचा बिगुल वाजणार आहे. आयपीएलच्या १६ व्या सिजनचे वेळापत्रक समोर आल आहे. आयपीएलचा पहिला सामना 31 मार्चला सुरू होणार आहे. पहिला सामना गतवर्षी विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात होणार आहे. आयपीएलची क्रिकेट चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते, मात्र आयपीएल सुरू होण्याआधीच या लीगमधील दोन मोठ्या संघांबाबत एक अपडेट समोर आली आहे.

आयपीएलमधील दुसरा सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) या संघाबाबत एक बातमी आहे. यातील आरसीबीसाठी समाधानकारक तर सीएसकेसाठी वाईट बातमी आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जेमिसन हा पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या हंगामामधून बाहेर पडला आहे. मागील 6 ते 7 महिन्यांपासून तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आताच पार पडलेल्या न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेआधी झालेल्या सराव सामन्यात जेमीसन खेळला होता. मात्र त्यानंतर कसोटी सामन्यामधून त्याला बाहेर पडावं लागलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.