ऐनपुर महाविद्यालयात “नशामुक्ती” विषयावर व्याख्यान…

0

 

ऐनपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात समान संधी केंद्रांतर्गत ‘नशामुक्ती’  या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.रेखा पाटील या होत्या, तर प्रमुख वक्ते म्हणून वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा.डॉ. एस. ए. पाटील हे होते.

प्रा.डॉ. एस.ए. पाटील यांनी ‘नशामुक्ती’, ‘सक्षम भारत आणि सुदृढ युवा’ या विषयावर आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, येणारी भावी पिढी सुदृढ आणि निरोगी व सक्षम राहण्यासाठी व्यसना पासून दूर राहिले पाहिजे. आहार, विहार आणि विचार शुध्द ठेवावे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच व्यसनाधीनता आणि जीवघेणी व्याधी त्यातून निर्माण होणारे विविध सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक समस्या याकडे सभेचे लक्ष वेधले, आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी दिनचर्येकडे लक्ष द्यावे आणि मोबाईल पासून दूर राहण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

अध्यक्षीय भाषणात डॉ. रेखा पी. पाटील यांनी म्हटले की, व्यसनाधीनतेपासून व्यक्ती ने दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, स्वताला कार्यमग्न ठेवावे, चांगले छंद जोपासा, ध्येय वेडे व्हा, वेळेला महत्व द्यावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. निता वाणी, डॉ. एस.एन. वैष्णव, प्रा. व्ही. एच. पाटील,  डॉ.पी.आर.गवळी,  प्रा.जे.पी. नेहेते, प्रा. प्रदिप तायडे, प्रा. अक्षय महाजन, श्रेयश पाटील , भास्कर पाटील यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन समान संधी केंद्रांचे समन्वयक प्रा. एस.पी.‌ उमरीवाड यांनी केले. तर आभार प्रा. अक्षय महाजन यांनी मानले. यावेळी महाविद्यालायातील विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.