निमड्या-सायबुपाडा येथे तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून…

0

 

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

आज दि 8 एप्रिल रोजी निमड्या येथील संजय रेमसिंग बारेला वय २५ या तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, निमड्या येथील संजय बारेला हा शुक्रवार रोजी पाच वाजेपासून खेकडे पकडण्यासाठी घरून गेला परंतु उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्याचा शोध घेण्यासाठी त्याचे वडील आणि लहान भाऊ मुकाराम पावरा गेले असता, सकाळी सात वाजता मुकाराम पावरा याला रस्त्याच्या बाजूला त्याची दुचाकी लागलेली दिसली. त्यांनी लागलीच बाजूला असलेल्या नाल्याजवळ जावून शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना नाल्यात संजय बारेला हा मृत्यू अवस्थेत पडलेला दिसला. या घटनेची माहिती माजी उपसरपंच इरफान तडवी यांनी पाल पोलीस स्टेशनला कळवली, त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, पो.हे.कॉ अमोकर यांनी घेटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली. विभागीय पोलिस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे, पो.नि कैलास नगरे घटनास्थळी उपस्थित राहून चौकशी केली. श्वान पथकाच्या माध्यमातून या घटनेची चौकशी केली गेली, संध्याकाळपर्यंत खुन्याचा कोणताच सुगावा लागला नाही. या घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.