कृषी पंपाच्या केबल चोरांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड…

0

 

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

तालुक्यातील शेती शिवारातील कृषी पंपाच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असुन, यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसात खामखेडा, दुई, सुकळी, टाकळी व चारठाणा शेती – शिवारातुन असंख्य शेतकरी बांधवांच्या शेतातील कृषी पंपाच्या केबलची चोरी झाली असुन, चोरांनी इतर साहित्यांची तोड-फोड केल्याने असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

दि. ६ रोजी दुई शिवारातील शेतकरी सचिन तळेले, दिनकर फेगडे, मुरलीधर फेगडे, मारुती चौधरी, विष्णु चौधरी, मुकेश तळेले, मिलिंद जावळे, तुषार फेगडे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची केबल चोरी झाली. तसेच, दि. ७ रोजी सुकळी शिवारातील २०-२२ शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरीच्या घटना घडल्या. दि. ९ रोजीच्या मध्यरात्री दुई शिवारातील एकनाथ खडसे यांचे स्वीय साहाय्यक योगेश कोलते व इतर अनेक शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची केबल चोरून मोटर स्टार्टरची तोड-फोड केल्याची घटना घडली.

दुई शिवारातील सचिन तळेले व संदिप जावळे यांच्या शेतातील खोलीचे कुलुप तोडुन खोलीत ठेवलेल्या केबल मधील तांब्याची तार पळवली. संदिप जावळे यांच्या शेतातील खोलीत असलेला टिव्ही फोडुन इतर सामानाची नासधुस केली. सोबतच डायरीत ठेवलेले चार हजार रुपयांवरही डल्ला मारला.

दरम्यान याप्रकरणी संदिप जावळे व काही शेतकऱ्यांनी पोलीसात तक्रारी दिल्यानंतर मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके, पो.उ.नि.प्रदिप शेवाळे, पो.ना.ठाकुर, नायसे होमगार्ड देवेंद्र काटे, सोपान वंजारी, सोपान बेलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रसंगी पोलीस प्रशासनाकडुन याप्रकरणी तपास केला जात आहे.

केबलची चोरी झाल्यास नवीन केबल खरेदी तसेच बोअरवेल मधील मोटार वर उचलण्यास लागणारे साहित्य खर्च, दोन मजुर खर्च असा प्रत्येकी तीन हजाराचा भुर्दंड प्रत्येक शेतकऱ्याला सोसावा लागत आहे. याव्यतीरीक्त अन्य साहित्यांची तोडफोड झाली असल्यास तो वेगळा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग त्रस्त झाला असुन चोरी करणारी टोळीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी शेतकरी बांधवांनी पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांचेकडे बोलतांना केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.