भाजपकडून जावडेकर, तावडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर मोठी जबाबदारी…

0

 

नवीदिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

२०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा कंबर कसत असून काल पक्षाने विविध राज्यांतील ‘सेनापतीं’ची (प्रभारी) नियुक्ती केली आहे. या यादीत माजी केंद्रीय मंत्री असलेले महाराष्ट्राचे प्रकाश जावडेकर (Prakash javadekar), तसेच राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) व पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपाने १५ राज्यांमध्ये आपले नवे प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले की, जेपी नड्डा यांनी नावांच्या यादीवर शिक्कामोर्तब केले आहे आणि ही यादी तत्काळ लागू करण्यात आली आहे.

 

जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार प्रभारीपदं
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर – केरळ
माजी मंत्री विनोद तावडे – बिहार
ओम माथूर – छत्तीसगडचे
बिप्लब कुमार देब – हरियाणाचे
लक्ष्मीकांत वाजपेयी – झारखंडचे
राधामोहन अग्रवाल – लक्षद्वीप
पी मुरलीधर राव – मध्य प्रदेशचे
विजय पंजाब आणि विजय राव – चंदीगड
तरुण चुघ – तेलंगणा
अरुण सिंग – राजस्थान
महेश शर्मा – त्रिपुरा
मंगल पांडे – पश्चिम बंगाल
संबित पात्रा – ईशान्य भारत

काही राज्यांतील सहप्रभारी

खासदार हरीश द्विवेदी – बिहार
आमदार नितीन नबीन – छत्तीसगड
खासदार डॉ. राधामोहन अग्रवाल – केरळ
पंकजा मुंडे आणि डॉ. रमाशंकर कथेरिया – मध्य प्रदेश
नरिंदर सिंग रैना – पंजाब
अरविंद मेनन – तेलंगणा
विजया रहाटकर राजस्थान
अमित मालवीय आणि डॉ. आशा लाक्रा – पश्चिम बंगाल
ऋतुराज सिन्हा – ईशान्य भारत

Leave A Reply

Your email address will not be published.