वेळेचा सदुपयोग सत्कार्यासाठी करावा…

0

 

चातुर्मास प्रवचन 10.09.2022

 

आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग सत्कार्यासाठी करावा. उत्तम कार्य करून या जगाचा निरोप घ्यावा असे आवाहन पू. जयेंद्र मुनी यांनी आजच्या आपल्या प्रवचनातून केले.

“जशी दृष्टी तशी सृष्टी।” असे म्हटले जाते. तुमच्या आचरणात शुद्धी कशी येऊ शकेल हा विचार ‘मेरी भावना’ या रचनेत कविने  केलेला आहे. तुमची भावना अंतर्मनातून येत असतील तर, तुमच्या भावना शुद्ध होणार यात तीळमात्र संशय नाही. महाराजा उदायन यांची कथा त्यांनी यावेळी उदाहरण म्हणून सांगितली. राजा असून त्यांनी आपली धर्म आराधना सोडली नाही. ते स्वतः तर आराधना करत असत परंतु आपल्या संपर्कातील सर्वांना चांगले कार्य करण्यासाठी सतत प्रेरणा देत असत. त्यांच्या मनात एकदा आले की, आपल्या नगरीत भगवान महावीर स्वामी यांचे आगमन व्हावे. त्यावेळी ते 700 कोस दूर होते. दळणवळणाचे साधने नव्हते परंतु राजा उदयान यांचे भाव भगवान महावीर यांच्यापर्यंत पोहोचले. जर शुद्ध भावना असतील तर उत्तमातील उत्तम कार्य आपल्या हातून होत असते. भगवान महावीर स्वामी यांच्यापर्यंत राजाची शुद्ध भावना पोहोचली. आपल्या मनात शुद्ध भावना निर्माण व्हावी असे आवाहन डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर मुनी यांनी आपल्या प्रवचनातून व्यक्त केले.

 

माझ्याकडे खूप वेळ आहे या भ्रमात कुणीही राहू नये. कोणत्या क्षणी शेवटचा श्वास घेऊ हे कधीच कुणी सांगू शकत नसतो. कधी कधी भ्रमात राहणे हेही खूप अनर्थ निर्माण करणारे ठरते. वेळेचे महत्त्व जाणून वेळेचा सदुपयोग करत आपले सत्कार्य करत रहावे असे आवाहन जयेंद्र मुनी यांनी प्रवचनातून केले.

 

सारा संसार आभास प्राप्तीसाठी सकाळ संध्याकाळ सारखा धावतच आहे. ज्ञानी म्हणतात की, सुख साधनांमध्ये नसते, भौतिक साधनांमुळे सुख प्राप्त होतात असा समज अनेकांच्या मनात आहे. हा मिळालेला वेळ आपण आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोगी आणला पाहिजे. आपण सर्व येथे पर्यटक म्हणून आलो आहोत. भगवानाच्या घरून आलो पुन्हा तिथे परत जायचे हे ध्यानात ठेवले पाहिजे. मृत्यू ला टाळण्याची शक्ती कुणातच नाही. जोवर जीवन आहे जे पुण्य, श्रेष्ठ, उत्तम कार्य करायचे आहे ते करावे असे आवाहन जयेंद्र मुनी यांनी आपल्या सुश्राव्य प्रवचनातून केले.

 

स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्य श्री पार्श्वचंद्र म.सा., अनुप्पेहा ध्यान प्रणेता डॉ. पदमचंद्र मुनी आदीठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. त्यामध्ये मेरी भावना ह्या रचनवेर आधारीत प्रवचन श्रुंखला सुरू आहे.

 

रविवारी ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० ते १०.३० दरम्यान प.पू. डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे ‘अनुमोदना’ या विषयावर विशेष प्रवचन आयोजलेले असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

 

Leave A Reply

Your email address will not be published.