गणपती विसर्जनावेळी बुडणाऱ्या मुलाला वाचवतांना युवकाचा मृत्यू…

0

 

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा करुन लाडक्या बाप्पाला निरोप देत असतांना जामनेर शहरावर मात्र शोककळा पसरली आहे.

सविस्तर वृत्त असे की जामनेर शहरालगत असलेल्या कांग नदीवर बोदवड पुला खाली भाविकांकडुन गणपती विसर्जन केले जात होते. त्याठिकाणी एक लहान मुलगा नदीत बुडत असतांना गणेशवाडी भागातील रहिवासी किशोर राजु माळी (२९) याला दिसला असता सदर तरुणाने आपल्या प्राणाची बाजी लावून बुडणाऱ्या बालकास वाचवले परंतु यात मात्र किशोर माळी हा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला व त्याचा करुण अंत झाला. हि घटना दि ०९/०९/२०२२ शुक्रवार रोजी सुमारे एक ते दिड वाजेच्या दरम्यान घडली. तरुणाला पोहता येत नसल्याने नियतीने डाव साधत त्यास हिरावून नेले. त्यावेळी इतर पोहणाऱ्या तरुणांनी पाण्यात किशोरचा शोध घेतला. अथक प्रयत्न केल्या नंतर त्यास बाहेर काढण्यात आले. मात्र तोवर त्याची प्राणज्योत मालवली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी तसेच दोन लहान मुली असा परिवार आहे. या घटनेने परिसरासह संपूर्ण शहरावर शोककळा पसरली.

Leave A Reply

Your email address will not be published.