करण पवार, उन्मेष पाटलांच्या जंगी स्वागतचा अन्वयार्थ…!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

देशातील लोकसभा निवडणुकीत महायुती अर्थात भाजप या सत्ताधारी पक्षाचा बोलबाला असताना सत्ताधारी पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. ऐतिहासिक निर्णय उन्मेष पाटील यांनी घेतला. त्यामुळे संपूर्ण देशाचे या तरुणाने लक्ष वेधून घेतले आहे. नुकतेच मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हाती शिवबंधन बांधून हातात मशाल घेतली. खासदार उन्मेष पाटील यांचे निकटवर्तीय खास मित्र पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनीही त्यांचे सोबत शिवसेनेत प्रवेश घेतला. स्वतःला जळगाव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवारी मिळत असताना ती नाकारून करण पवार यांना जळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊ केली. परवा मुंबईत शिवसेनेत प्रवेश सोहळा पार पडला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी करण पवारांची उमेदवारी घोषित केली. काल दुपारी रेल्वेने करण पवार आणि उन्मेष पाटील यांचे जळगाव आगमन होताचा शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस या मित्र पक्षातर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागताच्या निमित्ताने एक प्रकारे शक्ती प्रदर्शनात झाले. त्यामुळे जळगावची निवडणूक एकतर्फी होईल, असे स्वप्न पाहणारा भाजपला आता कडवी टक्कर द्यावी लागेल असे चित्र निर्माण झाले आहे. कारण पवार यांना मोठा राजकीय वारसा आहे. पारोळ्याचे माजी आमदार कै. भास्कर अप्पा पाटील यांचे ते नातू असून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर संतोष पाटील यांचे ते सखे पुतणे आहे. २००९ मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पारोळा नगरपालिकेत नगरसेवक आणि २०१४ आणि २०१९ मध्ये भाजप तर्फे दोन वेळा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. भाजपचे संकट मोचक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे ते कट्टर समर्थक कार्यकर्ते होत. खासदार उन्मेष पाटील यांचे ते खास निकटवर्तीय मित्र आहेत. करण पवार यांचे वडील बाळासाहेब पवार हे जिल्हा परिषद सदस्य होते. आई सुद्धा नगरपालिकेत निवडून आलेल्या होत्या बी. ए. ची पदवी प्राप्त केलेल्या या तरुणाचे वय अवघे ३७ वर्षाचे आहे. हे विशेष घराण्याचा राजकीय वारसा आणि मित्र खासदार उन्मेष पाटील यांच्या मित्राद्वारे सहकार्य करण पवार यांना लोकसभा निवडणुकी मदत स्वरूप ठरणार आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार स्मिता वाघ आणि शिवसेनेचे उमेदवार करण पवार अर्थात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार तर दोन मतदार संघात भाजप आणि अमळनेर मध्ये राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसचे आमदार आहेत. तथापि या सहा ही मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. जळगाव ग्रामीण मतदार संघात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे चांगलेच वर्चस्व आहे. पारोळा हे करण पवारांचा तालुका आहे. चाळीसगाव तालुक्यात खुद्द खासदार उन्मेष पाटलांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे करण पवार या निवडणुकीत चांगली टक्कर देऊ शकतात रेल्वे स्टेशन वरील त्यांच्या स्वागतासाठी मतदार संघातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

करण पवार आणि त्यांचे चुलते डॉक्टर सतीश अण्णा पाटील यांचे आतापर्यंत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे वेगवेगळे पक्ष असल्याने त्यांच्या राजकीय मनसे होते. तथापि आता करण पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने ते महाविकास आघाडीचे उमेदवार असून महाविकासच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण पवार यांना निवडणूक प्रचारात मोलाची मदत होण्याची शक्यता आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत खुद्द शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे बोलणे झाल्याचे सांगण्यात येते पारोळा मतदार संघाची जागा शिवसेनेची आणि चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीची असताना आपसात अदलाबदल करण्यासंदर्भात बोलणे झाल्याचे कळते. एकंदरीत नियोजन स्वरूपातील हालचाली होत असल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. काल अचानक माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांना भाजपचे संकटमोचक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना जामनेरला बोलवून घेऊन यांच्याशी चर्चा केली आहे. “चर्चेत नेमकी काय घडले हे जाहीरपणे मी सांगू शकत नाही. याबाबत आमचे नेतेच बोलू शकतील”, असे माध्यमांशी बोलताना ए. टी. नाना पाटील यांनी सांगितले. तसेच ‘पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडणार, असल्याचे सांगितले. पक्षाने पुन्हा तुम्हाला उमेदवारी दिली तर आपण घेणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता “उमेदवारी मिळणार मिळत असेल तर कुणाला नको असते. ” असे सूचक विधान ए. टी. नाना पाटील यांनी केले त्याचा अन्वयार्थ काय? त्यामुळे गेल्या पंधरा-वीस दिवस भाजपची उमेदवारी घोषित होऊन झालेली असताना करण पवारांची उमेदवारी घोषित झाल्यावर भाजप गोटात मोठ्या हालचालींना वेग आला आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.