विशेष सरकारी वकील आरोपीच्या पिंजऱ्यात?

0

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळा आणि जळगाव येथील मल्टीस्टेट बी एच आर पतपेढी अपहार प्रकरण, या गाजलेल्या दोन खटल्यातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे विरुद्ध आरोपींकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळा आणि बी एच आर घोटाळ्यातील अपहार प्रकरण घडल्यानंतर विशेष सहकारी वकील हिरो झाले होते. दोन्ही खटले कोर्टात चालू असताना दररोज कामकाजाचे खळबळजनक वृत्तांत जळगाव जिल्हा वासियांमध्येच नव्हे तर राज्यभरात चर्चेचा विषय बनले होते. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण या दोन्ही खटल्यात हिरो बनले होते. न्यायालयात वेगवेगळे पुरावे सादर करून आरोपींना जेरीस आणले होते. घरकुल घोटाळा आरोपींना अटक होऊन त्यांना शिक्षा झाली. घरकुल घोटाळ्यातील निकालाचे यश विशेष सरकारी वकील यांच्या डोक्यात शिरले होते. हे यश त्यांना पचवता आले नाही. घरकुल घोटाळा खटल्याचा निकाल लागल्यानंतर ‌एडवोकेट (Advocate) प्रवीण चव्हाण यांच्याकडे जळगावच्या बी एच आर पतपेढीचा अपहार प्रकरणात विशेष सहकारी वकीलपदी जबाबदारी शासनातर्फे सोपवली गेली.

घरकुल घोटाळ्याप्रकरणी बी एच आर अपहार खटल्यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Praveen Chavan) यांनी प्रसिद्धीचे शिखर गाठण्याचा प्रयत्न केला. त्यात काही अंशी त्यांना यश सुद्धा आले. दररोजच्या खटल्याची माहिती पत्रकारांना देऊन वृत्तपत्राचे रकानेच्या रकाने खळबळजनक माहिती प्रसिद्ध होत होती. त्यात जळगावच्या मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या (नूतन मराठा महाविद्यालय) संचालक ॲड विजय पाटील यांनी जळगावचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा आसोदा पोलीस स्टेशनला दाखल करून पुणे पोलिसात वर्ग केला. गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यात आला. ‘विशेष सरकारी वकील बोले आणि पोलीस दल हले’ अशी परिस्थिती खळबळ उडवत होती. ॲड प्रवीण चव्हाण यांच्या सूचनेवरून पुण्याच्या विशेष पोलीस पथकाने जळगाव येऊन भोईटे तसेच इतरांच्या घरावर धाडी टाकल्या. बी एच आर प्रकरणात अनेक बड्यांना अटक करून देण्यात आले. जळगावच्या धाडी प्रकरणाचे नंतर विधानसभेत एका पेन ड्राईव्हच्या माध्यमातून तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिंडोळे काढले. पुण्याचे विशेष पोलिसांचे प्रथक आणि विशेष सरकारी वकील यांचा पर्दा फाश केला. त्यानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. पहिली नामुष्की ॲड प्रवीण चव्हाणांवर त्यांच्या राजीनाम्याने ठोकली गेली. त्यांनी दिलेल्या विशेष सरकारी वकील पदाच्या राजीनाम्यानंतर त्यांनी कोर्टात चालविलेल्या सर्व खटल्यांबाबत त्यांच्याकडे संशयी नजरेने पाहिले जाऊ लागले. त्यांनी चालवलेल्या खटल्यात आरोपी विरुद्ध सादर केलेल्या पुराव्यात अशाच प्रकारे बनवाबनवी तर केली गेली नसेल ना? अशा प्रकारचे प्रश्न चिन्ह निर्माण होणे सहाजिक आहे. जोपर्यंत ॲड प्रवीण चव्हाण यांच्यावर विधानसभेत झालेल्या आक्षेपातून ते निर्दोष मुक्त होत नाही, तोपर्यंत त्यांच्याविषयी संशयाची सुई राहील यात शंका नाही.

विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष स्टिंग ऑपरेशन केलेला पेन ड्राईव्ह सादर करून गाजलेल्या खटल्यात हिरो असलेल्या ॲड प्रवीण चव्हाण यांना झिरो करून टाकले. विशेष सरकारी वकील म्हणून प्रवीण चव्हाण यांनी निर्माण केलेली जाज्वल्य प्रतिमा एका क्षणात मलिन झाली. पुढे जे सिद्ध व्हायचे ते होईल, पण आजच्या घडीला ॲड प्रवीण चव्हाण यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. विचार खटल्यातील प्रमुख संशयित आरोपी सुनील झंवर यांचे सुपुत्र संशयित आरोपी सुरज झंवर यांनी ॲड प्रवीण चव्हाण यांनी सुनील झंवर यांना जामीन मिळवून देण्यासाठी १ कोटी २२ लाखाची खंडणी घेतल्याचा आरोप करून पुण्याच्या डेक्कन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. विशेष सरकारी वकील म्हणून प्रवीण चव्हाण यांनी अनेकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आता त्याच सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल व्हायला नियतीचा खेळ म्हणतात. सरकारी वकिलांनी खंडणी मागितल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याशिवाय पोलिस गुन्हा दाखल करतील का?

ॲड प्रवीण चव्हाण यांना मिळालेली प्रसिद्धी त्यांना पचवता आली नाही यशाच्या धुंदीत प्रवीण चव्हाण होते. विशेष सरकारी वकील चव्हाण यांचे कामकाज आता संशयाच्या भौऱ्यात सापडले आहे. त्यामुळे त्यांच्या खटल्यातील सर्वच आरोपींची हिम्मत वाढली आहे. असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. त्यामुळे ॲड प्रवीण चव्हाण यांना वकिली पेशाच्या गुणवत्तेची आता कस लागणार आहे. यातून ते जे निष्पन्न होईल ते सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल, यात मात्र शंका नाही…!

Leave A Reply

Your email address will not be published.