“RRR” ठरला सिएटल क्रिटिक ॲवॉर्डचा मानकरी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई तर केलीच, पण जागतिक स्तरावरही हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने काही दिवसांपूर्वी मानाचा गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला. त्यानंतर क्रिटिक्स चॉइस ॲवॉर्डही जिंकला. आता पुन्हा एकदा या चित्रपटाने तिसरा पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
१७ जानेवारी रोजी, सिएटल फिल्म क्रिटिक्स असोसिएशनने २०२२ च्या पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये एसएस राजामौलीच्या (S. S Rajamouli) आरआरआरला बेस्ट ॲक्शन कोरिओग्राफीसाठी सिएटल क्रिटिक ॲवॉर्ड (Seattle Critic Award) देण्यात आला. त्यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.प्रेम रक्षित आणि दिनेश कृष्णन यांनी चित्रपटातील गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन केलं होतं. तर, विकी अरोरा, इव्हान कोस्टाडिनोव्ह, निक पॉवेल आणि रायचो वासिलिव्ह हे RRR साठी स्टंट को-ऑर्डिनेटर होते. दरम्यान, ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्यानंतर कोरिओग्राफर प्रेम रक्षित भावूक झाला होता. एवढा मोठा पुरस्कार मिळेल, असं वाटलं नव्हतं. पुरस्कार मिळाल्याचं कळाल्यावर मी बाथरूममध्ये दीड तास रडत होतो, असं प्रेम रक्षितने सांगितलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.