धनुष्यबाण चिन्हच कायमचं गोठवले जाऊ शकतं? कायदेतज्ञ उज्वल निकम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई – संपूण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण  निवडणुक आयोगासमोर सुनावणी  महासुनावणी सुरु आहे. शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाण  चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे  आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  गटात जोरदार चढाओढ सुरु आहे. दोन्ही गटातर्फे वकिलांची फौैज निवडणुक आयोगासमोर आपली बाजू मांडत आहेत. यामुळे धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. त्यातच या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कायदेतज्ञ उज्वल निकम यांनी मोठा दावा केला आहे. शिवसनेचं धनुष्यबाण चिन्हच कायमचं गोठवले जाऊ शकतं अशी शक्यता उज्वल निकम  यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा याचा फैसला आता 20 जानेवारीला होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकललीय. आयोगासमोर कागदपत्रांवरून दोन्ही गटांमध्ये शिंदे आणि ठाकरे गटानं जोरदार युक्तिवाद केला. तर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी घाईघाईनं निर्णय़ देऊ नये अशी मागणी आयोगासमोर केली. त्यामुळे आता पुढच्या सुनावणीत आयोग निकाल देणार की नाही याबाबत उत्सुकता वाढली आहे.
धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबत कायदेतज्ञ उज्वल निकम यांनी खूप मोठा दावा केला आहे. 16 आमदारांच्या पात्रतेचा निर्णय सर्वेच्च न्यायालात प्रलंबित आहे. शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्ययालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे. धनुष्यबाण कोणाला मिळणार हे निवडणूक आयोग ठरवले. आमदारांच्या पात्रता अपात्रता हा निवडणुक आयोगापुढचा विषय नाही. पक्षाची घटना तपासून निवडून आलेले प्रतिनिधी कोणाच्या बाजूने निवडूण आले ही बाब निवडणूक आयोग तपासणार. या सर्व प्रक्रियेला वेळ लागू शकतो. यामुळेच निवडणूक आयोग शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कायमचं गोठवू शकते अशी शक्यता उज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.