खामगावात अतिक्रमणावर बुलडोजर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
खामगाव – आज शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाने बुलडोजर चालविला. अचानक झालेल्या या कारवाईने अतिक्रमणधारक चांगलेच धास्तावले आहेत.
शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदीकरण करण्यात आले आहे. रोडच्या दुतर्फा अंडरग्राऊंड नाल्या बांधण्यात आलेल्या आहेत. मात्र या नाल्यांवर मोठया प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे. दरम्यान महामार्ग प्रशासनाने महिनाभरापूर्वी रोडवरील अतिक्रमणधारकांना नोटीसेस बजावून रोडच्या हद्दीतील अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अतिक्रमणधारकांनी याची दखल घेतली नाही. दरम्यान आज सकाळी महामार्ग प्रशासनाने पोलिस संरक्षणात अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरु केली.  रोडच्या हद्दीतील अतिक्रमीत टपऱ्या, दुकाने जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आली. अचानक सुरु झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली. अनेकांनी धावपळ करत आपली अतिक्रमणे काढुन घेतली. न.प. टर्निंगपर्यंतची अतिक्रमीत दुकाने हटविण्यात आली.

पथकाने अतिक्रमण धारकांना संधी दिली होती. परंतु ज्यांना संधी दिली होती त्यांनी अतिक्रमण काढले नाही अशांच्या टपऱ्या रात्रीपर्यंत उचलण्याचा कार्यवाही सुरू होती. सदर कारवाई बाळापूर नाका ते सुटाळा खुर्द दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या नालीवर वसलेले अतिक्रमण काढण्यात येणार आहे अशी माहिती महामार्ग प्रशासनाचे अधिकारी यांचेकडून मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.