शासनाच्या योजनांचा लाभ घेत मल्हार कुंभार बनले आदर्श शेतकरी…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शेतकरी समृद्ध व्हावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा शाश्वत विकास व्हावा यासाठी शासनाकडून अनेक लाभदायी योजनांची अंमलबजावणी केली जाते. याच योजनांचा लाभ घेऊन चोरवड (ता. पारोळा) येथील युवा शेतकरी मल्हार प्रल्हाद कुंभार यांनी आधुनिक पद्धतीने शेती करत आदर्श शेतकरी होण्याचा मान मिळविला आहे.

कृषी विभागातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेंतर्गत त्यांना इलेक्ट्रिक मोटार, पाईप, ठिबक, शेततळे आणि त्या माध्यमातून मत्स्यपालन, फळबाग, बांधावर बांबू लागवड, सेंद्रिय गांडूळ खत युनिट, शेतकरी गटाला औजार बँक, रेशीम उद्योगासाठी तुती लागवड तसेच अटल सौर पंप योजनेच्या माध्यमातून ५ एच. पी. क्षमतेचा सौर पंप मिळाला आहे.

युवा शेतकरी मल्हार कुंभार यांचे शिक्षण कृषी पदवीपर्यंत झाले आहे. वडिलोपार्जित पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला. यात अटल सौर पंप योजनेअंतर्गत त्यांना ५ एचपी क्षमतेचा सौर पंप मिळाला आणि वारंवार उदभवणाऱ्या विजेच्या समस्येवर त्यांनी मात केली. पोकरा योजनेंतर्गत शेततळे, त्यामाध्यमातून मत्स्य पालन सुरू करत दुहेरी उत्पन्न सुरू केले आहे. शेतकऱ्यांचा समूह तयार करून अवजार सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमिनीच्या मशागतीसाठी यंत्र अत्यंत माफक दरात पुरविण्याचे काम या माध्यमातून सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.