तोंडावर ऍसिड फेकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल…

0

 

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क:

 

तोंडावर अॅसिड फेकण्याची धमकी देत शहरातील एका भागातील १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडित युवतीच्या आईच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा शहरातील एका भागातील १३ वर्षीय युवतीस समीर पिंजारी (१९) रा. कुर्बान नगर, माहिजी रोड, पाचोरा हा गेल्या दोन महिन्यांपासून पाठलाग करत “तु माझ्या सोबत चल, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तु माझ्या सोबत नाही आली तर तुझ्या तोंडावर अॅसिड फेकून देईल” अशी धमकी देत होता. दरम्यान २७ जुलै रोजी दुपारच्या सुमारास पुन्हा सलीम पिंजारी याने पिडितेस गाठुन तिचा विनयभंग केल्याने पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये समीर पिंजारी विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.