जळगाव शहर पुन्हा गोळीबाराने हादरले; व्यावसायिकाच्या घरावर हल्ला…

0

 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क:

 

गेल्या अनेक दिवसांपासून शहरात वाळू माफियांची दादागिरीच्या अनेक बातम्या समोर येत आहे. त्यात आज खंडणीची मागणी करत एका टोळीने शहरातील के. सी. पार्क परिसरात रात्री आठच्या सुमारास वाळू व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील ममुराबाद रोडवर के. सी. पार्क कॉलनीत शुभम माने हा वाळू व्यावसायिक वास्तव्यास आहे. दरम्यान आज रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर टोळक्याने धुडगूस घालत त्याला खंडणी मागितली. त्याला वरच्या मजल्यावरून खाली बोलावण्यात आले. मात्र ते समोर न आल्याने टोळक्याने खालूनच एकदा गोळीबार केला. यानंतर यातील काही जणांनी वरच्या मजल्यावर येऊन त्यांच्या दरवाजावर दगडफेक करतांनाच पुन्हा गोळीबार केला. अशा प्रकारे या टोळक्याने दोन-तीन राउंड फायर केले. यानंतर शुभम माने यांना धमकावत या टोळीने तेथून पलायन केले.

घटनास्थळी पोलिसांची धाव…

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एलसीबीचे प्रमुख किसनराव नजन पाटील आदींसह शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या संदर्भात मयूर माने यांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळक्यामध्ये लखन उर्फ गोलू मराठे, लखन शिंदे, नरेश शिंदे, बंटी बांदल, पवन गावढे, केयूर पंधारे आदींसह अन्य आठ-दहा जणांचा समावेश होता. या संदर्भात त्यांनी शहर पोलीस स्थानकात प्राथमिक तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रात्री उशिरापर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट चेक करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

Leave A Reply

Your email address will not be published.