जमिनीच्या वादातून पिता पुत्राचा गोळ्या झाडून खून

0

;- शासकीय मालकीच्या जमिनीच्या हक्कावरून नातेवाईकांमध्ये झालेल्या वादाचे हाणामारी मध्ये रूपांतर होऊन यात एकाने गावठी कट्ट्याने गोळीबार केल्याने पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शहादा तालुक्यातील पिपली पाडा येथे घडली .

या घटनेत आठ जण जखमी झाले असून गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पाच संशयतांना पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश सुखराम खर्डे वय26 सुक्राम कलजी खर्डे वय 45 अशी मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत शहादा तालुक्यात मलगाव येथून अडीच किलोमीटर अंतरावर पिपली पाडा असून या ठिकाणी सुक्राम खर्डे हे शासकीय जमीन कसत होते. या जमिनी बाबत नातेवाईकांमध्ये वाद सुरू असल्याने तो न्यायप्रविष्ठ होता. गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सुखराम खर्डे हे आपल्या कुटुंबासह शेतात निंदणी करत असताना यावेळी सुनील राजेंद्र पावरा अरुण राजेंद्र पावरा ललिता राजेंद्र पावरा राहणार बिड्या तालुका पानसेमल मध्य प्रदेश गणेश दिवाणखरडे सोनीबाई गणेश खरडे रमीबाई दिवाण खरडे राहणार मालगाव तालुका शहादा हे सर्वजण शेतात येऊन त्यांनी तुम्ही शेतात निंदणी करू नका ही ही जमीन आमची असल्याचे सांगितले या कारणावरून दोन्ही कुटुंबात वाद निर्माण होऊन त्याचे पर्यावरण हाणामारीत झाले या हाणामारीत विळा तलवारी लाकडी दांडगे आधी हत्यारांचा वापर करण्यात आला संतापात सुनील पावरा याने त्याच्याकडे असलेल्या गावठी कट्ट्यातून दोन राऊंड फायर केले. यात अविनाश हा जागीच ठार झाला, तर सुखराम हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना ते मृत पावले. या घटनेमुळे नंदुरबार जिल्हा हादरला असून घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पवार, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी भेट दिली दरम्यान गावात तणावपूर्ण शांतता असून चौक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.