मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेस ट्रकने उडविले

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील गांधी पुतळ्याजवळ सकाळी पायी फिरणार्‍या प्रौढ महिलेस ट्रकने उडविल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

भुसावळ शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाजवळच्या रस्त्यावरून जात असलेल्या मीनाबाई मोहन अग्रवाल (वय ५५) या महिलेला या मार्गावरून जाणार्‍या ट्रकने धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या मंदिरात दर्शनासाठी जात असतांना काळाने त्यांच्यावर झडप घातली.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. मयत महिला ही तु.स. झोपे शाळेजवळ, मेथाजी मळा येथील रहिवासी असून त्यांच्या अपघाती निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.