चहावर निकाह.. मनियार बिरादरीचा स्तुत्य उपक्रम

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

रविवारी ३० जानेवारी रोजी पाळधीहुन हाजी शेख अब्दुल हमीद हे आपले चिरंजीव हाशेरुनच्या साखरपुड्यासाठी जळगाव शहरातील उस्मानिया पार्क शेजारील उमर कॉलनीमध्ये शेख आबिद शेख मेहबूब यांची मुलगी सबानाझसाठी आले असता त्या ठिकाणी दुपारी दोन वाजता साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

बिरादरी पोहचली दारी…

सदर साखरपुडा झाल्याची बातमी जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीच्या विविध पदाधिकाऱ्यांना कळली असता त्यांनी त्वरित उमर कॉलनी गाठून वराचे वडील हाजी शेख हमीद व खास करून वर वराची आई तबस्सुम बी, तसेच वधूची आई रोशन आरा व वडील आबिद शेख यांच्याशी चर्चा करून साखरपुडा झालेला आहे लग्न मार्च महिन्यात होणार आहे तर आजच आपण सगळे याठिकाणी जमलेलो आहोत तर का नाही आम्ही याचे निकाहमध्ये रूपांतर करू शकतो. त्यावर चर्चा केली. या चर्चेत खास करून वराची बहिण तरन्नुम बी व नातेवाईक फैजपूर चे शेख इलियास, पाळधी चे शेख अजीज व शेख हबीब पाचोऱ्याचे शेख मुनाफ व शेख आरिफ वधू कडील शेख महेमुद , शेख मजहर हुसेन, शेख मुख्तार, हाजी शेख निसार,हाजी इब्राहीम,असलम ताहेर यांच्यासह जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे रिश्ते नाते कमिटीचे प्रमुख फारूक टेलर, जिल्हाध्यक्ष फारुक शेख, महानगराध्यक्ष सय्यद चाँद, ताहेर शेख आदींनी चर्चा करून हा निकाह करण्याचे ठरविले. म्हणजे केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे याची प्रचिती बिरादरीने अनुभवली.

निकाह फक्त चहावर

उस्मानीया पार्क येथील ताजु शरिया मशिदीचे इमाम मौलाना मुबारक अली हाफिज यांनी खुतबए निकाहचे पठण करुन दुआ करून हा विवाह पार पडला. सर्व उपस्थित वराती व पाहुण्यांना चहा देण्यात आली व हा निकाह चहावर संपन्न झाला.

नवरदेवाचे उपस्थित मित्राला उत्तर

नवरदेव हा पालधी येथे गॅरेजवर काम करतो त्याच्या मित्राने विचारले दहेज मे क्या मिला? त्यावर त्याने उत्तर दिले एका आईने पोटचा गोळा, बापाने आपली सर्वात आवडती वस्तु, भावाने व बहिणीने आपली मोठी ताई जी यांची काळजी घेत होती ती दिल्यावर अजुन काय पाहिजे असे मार्मिक उत्तर देऊन आपले सासु- सासऱ्यांचे आशीर्वाद घेतले.

अश्रु.. दुआएं .. आभार

बिदागिरीच्या वेळेस वधुच्या आई- वडीलांनी बिरादरीच्या पदाधिकाऱ्यांना नयन अश्रुनी दुआ देत त्यांचे सुद्धा आशीर्वाद घेतले. बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी हाजी हमीद शेख, पालधी, आबिद शेख जळगाव व फारूक टेलर, जळगावचे विशेष आभार मानले. जे आजारी असून सुद्धा त्यांनी आपले रिश्ते नाते कमेटीच्या प्रमुखाची जबाबदारी पार पाडली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.