जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या गाडीला भीषण अपघात…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या गाडीचे टायर फुटल्याने नशिराबाद जवळ भीषण अपघात झाला. या गाडीने पलटी घेतली परंतु सुदैवाने गाडीतील कोणालाही इजा पोहोचली नाही. गाडीमध्ये सुनील भंगाळे यांच्या समवेत जळगाव जिल्हा संघटनेचे सचिव अनिल झंवर, इरफान सालार, दिनेश मालू हे देखील होते. गाडीतील सर्व जण सुखरूप असल्याचे वृत्त आहे. गाडी नंबर  एमएच 19 सीओ 8240 ही जिल्हा सचिव अनिल झंवर यांची होती. भुसावळ येथून केमिस्ट संघटनेची मिटिंग करून परतत असतांना नशिराबाद जवळ ही घटना घडली.

अपघातानंतर सर्वांना तात्काळ गाडीतून बाहेर काढण्यात आले. टायर फुटून गाडीने जोरदार पलटी घेतली होती. सर्वांवर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.