धरण फुटल्याची अफवा; सर्वत्र भीतीचे वातावरण….

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परिसरात असलेल्या कुंड जवळील गोरक्षनाथ नदीला बांधण्यात आलेल्या धरणाची भिंत उंच करून धरणाची उंची वाढवण्याचे काम गेल्या चार सहा महिन्यापासून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रयत्नातून सुरू होते.

दरम्यान हे काम सुरू असताना त्या ठिकाणी मातीचे ढीग व बांधकामाचे मटेरियल पडलेले आहेत. त्यात राज्यभरासह सर्वत्र पाऊस सुरु आहे. त्यामुळे तालुक्यातही संततधार सुरु आहे. त्या संततधार पावसामुळे धरणाला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे धरणावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्याच्यामुळे त्याठिकाणी असलेल्या माती व बांधकामाचे मटेरियल हे वाहून गेले व मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग शेजारील परिसरात व शेतांमध्ये घुसला.

पाण्यासोबतच तिथे असलेले बांधकामाचे मटेरियल काहींनी पाहिले असता त्यांना असा भास झाला की त्या ठिकाणी असलेले धरण हे फुटले असावे. परंतु त्या ठिकाणचे फक्त माती ही वाहून गेली. दरम्यान या ठिकाणी आमदार एकनाथराव खडसे यांनी भेट दिली आहे तर आमदार चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी भेट दिली असल्याचे समजते. परंतु धरण फुटल्याची अफवा मात्र परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.