सुकी नदीचा पूर पाहण्यासाठी गेला… आणि बेपत्ता झाला…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जिल्ह्यात सर्वत्र पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती ओढवली आहे. नदी नाले आणि जलाशये तुडुंब भरून वाहत आहेत. त्यातच रोझोदा ता.रावेर येथील तरुण गारबर्डी धरणावर सुकी नदीला पूर पाहण्यासाठी मित्रांसोबत गेला होता. यावेळी पाण्यात पोहत असतांना तो बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. प्रशासन त्याचा आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या मदतीने शोध घेत आहे. हि घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे.

येथील 33 वर्षीय विवाहित तरुण गारबर्डी धरणाला आलेल्या पूर पाहण्यासाठी मित्रांसोबत गेला गेला होता. यावेळी मित्र जेवणासाठी गेल्यावर नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी जात असल्याचे सांगून परत न आल्याने, बेपत्ता झाला आहे. रवींद्र दगडू चौधरी उर्फ महेंद्र कोळी असे बेपत्ता झालेल्या तरुणांचे नांव आहे. तरुणाचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ चे पथक तैनात करण्यात आले आहे. तर तहसीलदार बंडू कापसे यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला आहे. दरम्यान शनिवारी दिवसभर झालेल्या संततधार पाऊसाने अतिवृष्टीचे संकट तालुक्यावर ओढवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.