खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना धरणगाव ते चोपडा रोडवर झाली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील धरणगाव ते चोपडा रोडवरील रोटवद ते साळवा फाटा रोडवर दि. २४ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास बाळू पांडूरंग साळुखे (वय ३४) हे साळवा फाट्याकडे पायी येत असतांना चोपड्याकडे जाणाऱ्या भरधाव खाजगी बस (क्र. एम.एच.४६.जे.०७६५) वरील चालक एकनाथ पंडित सैदाणे (रा.चोपडा) याने ओव्हरटेक करीत असतांना साळुखे यांना जबर धडक देत गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी एकनाथ सैदाणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहा.फौ.सैय्यद करीम हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.