मोठी घोषणा ! पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान मानधन

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठी घोषणा केली आहे. पुरुष आणि महिला क्रिकेट खेळाडूंच्या (women cricketer)  मानधनाबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे.

BCCI ने करारबद्ध भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी समान मानधन धोरण लागू करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना सामन्यासाठी दिले जाणारे समान असेल, असे बीसीसीआयने (BCCI) म्हटले आहे. याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा (BCCI Jay Shah) यांनी ट्विट करत दिली आहे.

‘आम्ही बीसीसीआय करारबद्ध महिला क्रिकेट खेळाडूंसाठी पे इक्विटी धोरण (pay equity policy) लागू करत आहोत. क्रिकेटर्स क्रिकेटमधील स्त्री-पुरुष समानतेच्या नव्या युगात प्रवेश करत असताना पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी मॅच फी समान असेल.’ अशी जय शहा यांनी माहिती दिली.

BCCI ने करारबद्ध केलेल्या महिला क्रिकेटपटूंना पुरुष क्रिकेटपटू इतकेच मानधन दिले जाईल. कसोटी सामन्यासाठी 15 लाख, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख, T20 साठी 3 लाख मानधन दिले जाईल. समान मानधन धोरण ही आमच्या महिला क्रिकेटपटूंप्रती बांधिलकी होती आणि त्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो, असे जय शहा यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.