निवेदन देवूनही गिरणा नदीत अवैध वाळू उत्खनन सुरूच..

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन केले जात आहे. याबाबत प्रशासनाला अगोदरच लेखी निवेदन देऊन सुद्धा कुठलेही कारवाई केली नाही.  त्या निषेधार्थ दि. २ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोरील आवारात राष्ट्रीय लहू शक्ती संघटनेतर्फे भव्य थाळी बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. असे लेखी निवेदन तहसीलदार मुकेश हिवाळे यांना राष्ट्रीय लहू शक्ती संघटनेचे खान्देश विभागीय अध्यक्ष रमेश कांबळे यांनी दिले.

या निवेदनात दिल्यानुसार,  भडगाव तालुक्याचा गिरणा नदी पात्रातून वाडे, गुढे, गोंडगाव, कोठली, निंभोरा, वडधे, गिरणा पंपिंग पिंपळगाव थडीचे, बांबरूड या परिसरातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन जेसीबी द्वारे केले जाते. नंतर डंपर व शेकडो ट्रक्टरद्वारे अवैदधरित्या वाळूची वाहतूक केली जात आहे. त्याबाबत रमेश कांबळे यांनी दि. १३/१०/२०२२ रोजी निवेदन दिले होते.

सदरचे अवैध वाळूची वाहतूक स्थानिक प्रशासकीय अधिकारी व स्थानिक पोलीसअधिकारी यांच्या संगनमताने सुरु असून यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसूल वाया जात आहे. तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी हप्ता मिळत असल्याने या बाबत स्थानिक अधिकारी पूर्णपणे कानाडोळा करीत असल्याचे जाणवत आहे. तरी दररोज मध्यरात्रीच्या दरम्यान होणारी अवैध वाहतूक डंपर आणि ट्रक्टरद्वारे केली जात आहे.

तरी सदरचे निवेदन देऊनही अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने आम्ही दि. २ नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालया  समोरील आवारात भव्य थाळी  बजाव आंदोलन करणार आहे. तरी आंदोलन प्रसंगी कोणत्याही प्रकारचा वाद विवाद अथवा काही अनर्थ घटना घडल्यास स्थानिक भडगाव तालुक्याचे प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार व भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  जबाबदार राहतील असे या पत्रकाद्वारे रमेश कांबळे यांनी सूचित केले आहे.

अशा आशयाचे निवेदन रमेश कांबळे यांनी दिले. निवेदनाच्या प्रती मा. मुख्यमंत्री साो.मंत्रालय मुंबई, मा.उप-मुख्यमंत्री साो.मंत्रालय मुंबई, मा.महसूल मंत्री साो.मंत्रालय मुंबई, मा.मधुकरराव कांबळे साो.आण्णाभाऊ साठे समिती सदस्य सचिव तथा राज्य मंत्री, मा.आमदार किशोर धनसिंग पाटील पाचोरा – भडगाव, मा.महसूल संचालक साो.सचिवालय, मा.महसूल आयुक्त साो.नाशिक विभाग नाशिक, मा.जिल्हाधिकारी साो.जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, मा.डी.एस.पी. साो.कार्यालय जळगाव जि.जळगाव, मा.प्रांताधिकारी साो.पाचोरा विभाग पाचोरा, मा.मुख्याधिकारी साो.भडगाव नगर पालिका, मा.पोलीस निरीक्षक साो.भडगाव पोलीस यांना प्रती पाठवण्यात आल्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.