बापरे..”राम नाम सत्य है” म्हणताच तिरडीवरुन उठला ‘मृत तरुण’

0

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अकोला जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चक्क अंत्यसंस्कारावेळी मृत तरुण उठून बसल्याने सगळेच थक्क झाले.

अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातल्या विवरा गावातील प्रशांत मेसरे या 25 वर्षीय तरूणाचा संध्याकाळी मृत्यू झाला होता. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेत असतानाच तो चक्क उठून बसल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. धक्कादायक म्हणजे तो फक्त उठूनच बसला नाही, तर गप्पाही मारू लागला.

सध्या त्याला गावातल्या एका मंदिरात ठेवण्यात आलं असून तो बोलत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. या घटनेचे सर्वदूर चर्चा रंगली असून या तरूणाला पाहण्यासाठी सध्या गावात मोठी गर्दी झाली आहे.

दरम्यान या गावात सध्या पोलीस पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत मेसरे हा तरूण मागच्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, बुधवारी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. मात्र, अंत्यसंस्कारासाठी नेत असताना हा तरूण तिरडीवरच उठून बसल्याने सगळेच थक्क झाले. प्रशांतकडे दैवी शक्ती असल्यामुळे तो मृत्यूनंतरही उठून बसल्याच्या चर्चा सध्या गावात सुरू आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.