दुचाकींची समोरासमोर धडक; युवक ठार,चौघे गंभीर जखमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नांदेड; येथे मांडवी गावालगत शिंगोडा फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले. त्यातील विवेक गणपत सोनुले या युवकाचा (शनिवार) मुत्यू झाला.

अनिकेत रवी रेणकेवार, आशन्ना चिनय्या कुटलवार, लक्ष्मण धर्मा कुंमरे अशी गंभीर जखमी झालेल्‍यांची नावे आहेत.

डोक्याला मार लागल्‍याने विवेक सोनुले याचा उपचार सुरु असताना मृत्‍यू झाला. अनिकेत रेणकेवार याची प्रकृती चिंताजनक आहे.   जखमींना शासकीय दवाखान्यामध्ये उपचारासाठी आदिलाबाद येथे हलविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.