(CHSL ) संयुक्त उच्च माध्यमिक परीक्षार्थींसाठी एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

मुंबई; (CHSL 2021 exam update)स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) परीक्षा -2021 परीक्षार्थींसाठी एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे.

आयोगाने उमेदवारांना अर्जाच्या शेवटच्या तारखेपूर्वी परीक्षेसाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 मार्च 2022 आहे. (CHSL 2021 exam update)

अधिसूचनेत म्हटले आहे की, “उमेदवारांच्या हितासाठी एकत्रित उच्च माध्यमिक (10+2) परीक्षा-2021 च्या इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच ७ मार्चपूर्वी त्यांचे ऑनलाइन अर्ज सादर करावेत. कोणत्याही तांत्रिक बाबींचा सामना करावा लागू नये यासाठी हे आवाहन करण्यात आले आहे.

उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात https://ssc.nic.in/ आणि शक्य तितक्या लवकर अर्ज करू शकतात. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या सूचना वाचा आणि त्यांची पात्रता तपासावी असे आवाहन केले आहे. (CHSL 2021 exam update)

Leave A Reply

Your email address will not be published.