नगरदेवळा ए.टी.गुजराथी कन्या विद्यालयात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

0

लोकशाही न्युज नेटवर्क

 

पाचोरा; विद्यार्थीनींना कुठल्याही परिस्थितीत स्वसंरक्षण करता आले पाहिजे यासाठी नगरदेवळा ता. पाचोरा येथील ए. टी. गुजराथी कन्या विद्यालयात विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. शिवकन्या बहुउद्देशीय संस्थेच्या अभिलाषा रोकडे यांनी हा उपक्रम शिवजयंती निमित्ताने तालुक्यातील काही शाळांमध्ये राबविला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक मांडताना अभिलाषा रोकडे यांनी आजच्या युगात महिलांना स्वसंरक्षण किती गरजेचे आहे हे उदाहरणा सहित पटवून दिले. तसेच कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापिका सी .टी. शेलार यांनी त्यांचा सत्कार केला.

यानंतर संदीप मनोरे, स्वप्निल पाटील, अभिजित सोळंखे, ऋषिकेश पाटील यांनी विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे प्रात्यक्षिकासह करून दाखविले. कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डी. एस. पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीयुत वानखेडे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.