लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या संख्येत मोठी वाढ चिडून येत आहे. अशातच बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे काल (गुरुवारी) एसटी बस आणि ड्यचाकीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तिघे मृत तरुण धाराशिव जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. हे तरुण गाडी खाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
सविस्तर माहिती अशी की, काळ संध्याकाळच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकींचा बिशन अपघात झाला. या अपघातात कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम आतकरे या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघेही धाराशिव जिल्ह्यात वास्तव्यास होते. हे तिघे मित्र धाराशिवहून बार्शीकडे निघाले होते.
तिन्ही तरुण एसटी बस खाली आल्याने. एका तरुणाचं शीर हे धडापासून वेगळं झालं. तर इतर दोघे जवळपास ५० फूटांपर्यंत फरफटत गेले. घटनेची माहिती मिळताच तांदुळवाडीतील ग्रामस्थ मदतीला आले. बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.