पारोळा येथे दुचाकीस्वाराचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

सुरत येथील रहिवासी रोहन श्रावण भोई हा आपल्या वडिलांसोबत चुलत भावाच्या घरभाराणीसाठी जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे जात असतांना पारोळा तालुक्यातील गावाजवळ त्याच्या मृत्यू झाला.

सविस्तर माहिती अशी की, कारंजी येथील पोलीस पाटील विकास पाटील यांनी पारोळा पोलिसांत याबाबत कळवले असता, गुरुवार (दि.२१) रोजी सकाळी ७.३० वाजता कारंजी गावाजवळील उड्डाण पुलावर बुलेट (क्र. जि.जे.०५ एन टी ५२२६) चा अपघात झाला. त्यात रोहन भोई (वय २२) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ग्रामस्थांनी त्यांना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. व अपघातात जखमी झालेले श्रावण भोई यांना धुळे येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. दरम्यान, अपघात कसा झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. या बाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पारोळा पोलीस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.