धक्कादायक; कोविडची आकडेवारी धडकी भरवणारी, रुग्णसंख्येत वाढ !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोना व्हायरसच्या नव्या JN.1 व्हेरिएंटने चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णसंख्येत मागील काही दिवस मोठी वाढ झाली आहे. मागील २४ तासात भारतात ६४० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या जवळपास ३००० इतकी आहे.

देशभरात ६४० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रायलयाच्या आकडेवारीनुसार ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २६६९ वरून २९९७ वर पोहोचली आहे. देशातील आतापर्यंतची कोविड-१९ रुग्णांची संख्या ४.५० कोटींच्या पुढे गेली आहे. केरळमध्ये आणखी एका मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंतच्या मृतांची संख्या ५,३३,३२८ वर पोहोचली आहे.

बुधवारी ६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद
देशभरात बुधवारी एकूण ६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. केरळमध्ये ३, कर्नाटकमध्ये २ आणि पंजाबमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला होता तर, ५९४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद बुधवारी झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.