मोठी बातमी; तामिळनाडूमध्ये भीषण अपघात, मृतांमध्ये 9 जणांचा समावेश

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

तामिळनाडूमधून भीषण बस अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. निलगिरी जिल्ह्यामध्ये पर्यटक बस १०० फूट दरी कोसळली आहे. या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये बसचालकासह ५९ प्रवासी होते.

मिळालेल्या माहिती नुसार, कुन्नुरमधून तेनकासीच्या दिशेने जातांना ही दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. कुन्नुरमधील मरपळमजवळ दरीत ही बस कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये ३ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ८ लाख रुपये, गंभीर जखमींना प्रयेकी १ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तामिळनाडूतील निलगीरी जिल्ह्यातील कुन्नुरजवळील बस अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झालं असून मी शोकाकुल कुटुंबासोबत आहे. तर जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो, असं X वर पोस्ट करण्यात आली आहे. तर PMNRF कडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांच्या २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.