घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

0

भडगाव ;– तालुक्यातील भोरटेक येथील माहेर असलेल्या एका 25 वर्षीय विवाहितेला माहेर होऊन घर घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत यासाठी पतीने दारूच्या नशेत तिला मारहाण करून किडनी विकून टाकण्याची धमकी देत तिचा छळ केल्याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की वृषाली जितेंद्र पाटील वय 25 यांचे भोरटेक तालुका भडगाव येथे माहेर असून पती जितेंद्र ज्ञानेश्वर पाटील सासरे ज्ञानेश्वर नारायण पाटील सासू हिरकनबाई ज्ञानेश्वर पाटील सर्व रा. संताजी चौक माळीवाडी अमळनेर हल्ली मुक्काम नाशिक आणि चुलत ननंद मनीषा नितीन पाटील राहणार नाशिक यांनी बाहेरून घर घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून गांजपाठ केल्याची फिर्याद वृषाली पाटील यांनी दिल्यावरून चौघांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पंचशीला निकम करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.