चोपडा तालुक्यात झाडाला गळफास घेऊन १७ वर्षीय मुलाची आत्महत्या

0

अडावद ;- चोपडा तालुक्यातील एका १७वर्षीय मुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सग्यादेव पाडा येथे राहणारा राजेंद्र रोहिदास पावरा वय १७ याने शिवारातील मोहाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस कॉन्स्टेबल नासिर तडवी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.